Advertisement

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सची मागणी

*मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन* 

दापोली: 9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनाची महाराष्ट्रात सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                 निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासींच्या सन्मानार्थ जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे.संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समुदायाच्या अधिकारांच्या रक्षणार्थ सन 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय देखील घेतला.
                    देशभरात व महाराष्ट्रात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. राजस्थान सरकार दरवर्षीच 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाची सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करते.तसेच अनेक राज्यांत 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.आदिवासी दिनानिमित्त राज्यांत,जिल्ह्यात, तालुक्यात व गावात सांस्कृतिक देखावे,रॅली,मेळावे,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.ऐवढेच नव्हे तर काही जिल्ह्यात आदिवासींचे हक्क व अधिकार यासाठी आंदोलन व मोर्चा काढले जाते.
                  
     आदिवासी समाजाची अस्मिता,अस्तित्व, स्वाभिमान ,संस्कृतीची ओळख, हक्क व अधिकारांची ओळख होऊन कर्तव्याची जाणीव होण्यासाठी सांस्कृतिक ऐक्य,सलोखा,विविधतेत एकता टिकून राहावी तसेच आदिवासींचे जल,जंगल, जमीन यातील अस्तित्व, सार्वभौमत्व टिकून राहावे ,आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी तसेच आमचे अनेक आदिवासी बांधव सरकारी कर्मचारी व अधिकारी आहेत. या दिवशी सुट्टी नसल्यामुळे आमच्या आदिवासी सरकारी कर्मचाऱ्यांना नाईलाजाने रजा टाकावी लागते.काही आदिवासी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नसल्यामुळे या दिवसाचा आनंद घेता येत नाही.म्हणून आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.राज्यात 10 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाची ही रास्त मागणी लक्षात घेऊन 9 ऑगस्ट 2022 रोजी जागतिक आदिवासी दिनाची सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी.अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments