Advertisement

पावरा फायटर्स 301.


*उपोषण 301; लढा एका शिक्षकाचा*

 दापोली: शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या उपोषणांचा लढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे,त्याचबरोबर सुशिलकुमार पावरा यांची बिरसा फायटर्स संघटनांच्या शाखासुद्धा महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चालल्या आहेत.301 वेळा उपोषण संख्या बघून बिरसा फायटर्स चा पावरा फायटर्स असा उल्लेख सोशल मिडीयावर लोक करू लागले आहेत.दोषी,भ्रष्टाचारी,बोगस विजय बाईत व नंदलाल शिंदे या शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31  दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना  सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 301 वे उपोषण पांगारवाडी दापोली येथे छेडले आहे.उपोषणाचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.
             निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने राजकीय पदाधिकारी, समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.बनावट प्रकरण पोलिस चौकशीत व बातम्यांद्वारे उघडकीस आले आहे.
               एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर सुद्धा 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अशा बोगस व वादग्रस्त दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी व 31 दोषारोपित एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांना सेवेतून बडतर्फ करा, माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा एकूण 28 मागण्यांसाठी मी दिनांक 29/07/2022  रोजी सकाळी 11.00 वाजता माझ्या निवासस्थानासमोर पांगारवाडी तालुका दापोली येथे माझे 301वे उपोषण करीत आहे.

Post a Comment

0 Comments