Advertisement

10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे साकोलीत आयोजन

*ग्लोबल नेचर क्लब, कटकवार विद्यालयातर्फे लागोपाठ 20 व्या वर्षी निसर्गशिबिराचे आयोजन*

 *ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे*
 *सहकार्य*

साकोली:-
    येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे लागोपाठ 20 व्या वर्षी '10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबिराचे' आयोजन करण्यात आले.निसर्गशिबिराच्या आयोजनाकरिता ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व नेफडो जिल्हा भंडारा यांचेसुद्धा सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ नेणारा तसेच निसर्ग -पर्यावरण या एकमेव विषयाला वाहिलेले 10 दिवसीय शिबीर लागोपाठ 20 वर्षे चालविणारे हे एकमेव नेचर क्लब किंवा पर्यावरण संस्था आहे अशी माहिती नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी दिली.2001ते 2019 सलग 19 वर्षे निसर्गशिबिराचे आयोजन केल्यानंतर 2021 व 2022 ला कोरोनाच्या तीव्र लाटेमुळे हे उन्हाळी निसर्ग शिबीर स्थगित करावे लागले पण यावर्षी मात्र 20 वे निसर्गशिबिराचे आयोजन करता आल्यामुळे अनेक निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना मनापासून आनंद झाला हे पण त्यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनात सांगितले
    या निसर्गशिबिरात सहभागी 50 शिबिरार्थीना दररोज वेगवेगळ्या भागात निसर्गभ्रमंतीला सकाळच्या प्रहरी नेण्यात येऊन त्यांना पक्षी,फुलपाखरे, चतुर,कोळी,कीटक,वनस्पती,फुले,साप ,सरपटणारे प्राणी यांचा सखोलरित्या प्रत्यक्ष परिचय करून दिला जात होता.सोबतच त्यांचे इंग्रजी -मराठी नावे, त्यांचे वैशिष्ट्य, अधिवास यावर सुध्दा विस्तृत माहिती दहाही दिवस प्रा.अशोक गायधने, निसर्गमित्र व शिबिर स्वयंसेवक युवराज बोबडे देत होते. 
 पहिल्या दिवशी शालेय परीसर व नवतळा परिसर येथे निसर्गभ्रमंती केल्यानंतर प्राचार्य रामकृष्ण हारगुडे व पर्यवेक्षक अशोक कापगते यांचे हस्ते निसर्गशिबिराचे उदघाटन करण्यात आले.दुसऱ्या दिवशी नर्सरी नर्सरीपहाडी,तिसऱ्या दिवशी पाटबंधारे वसाहत, चौथ्या दिवशी भारताचे प्रख्यात पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांच्यासमवेत भिमलकसा तलावावर निसर्गवाचन व पक्षीनिरीक्षण कार्यक्रम सोबतच पिटेझरी गेट,उमरझरी येथे सुध्दा क्षेत्र भेट देण्यात आली.भिमलकसा तलावावर निसर्गतज्ञ किरण पुरंदरे यांनी विस्तृत मार्गदर्शन करून विविध पक्षी,किटक, वनस्पती यांचा परिचय करून दिला. स्पॉटिंग स्कोप मधून अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडविले सोबतच कवी ग. दि. माडगुळकर यांची "बिनभिंतीची उघडी शाळा" या कवितेचे पूर्ण वाचन केले व स्वरचित निसर्गकाव्यवाचन, अनेक प्राणी-पक्ष्यांचे आवाज काढुन शिबिरार्थीसोबत निसर्गरम्य वातावरणात हितगुज, निसर्गगप्पा केल्या. या उपक्रमाला साकोली वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल चव्हाण मॅडम तसेच लाखनी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सुरज गोखले,बिटगार्ड अजय उपाध्याय व महेश जाधव यांनी खूप सहकार्य या उपक्रमाला केले. पाचव्या दिवशी गडकुंभली तलाव व पहाडी सोबतच साकोली गावतलाव येथें निसर्गभ्रमंती, सहाव्या दिवशी शिवणीबांध जलाशय, मत्स्यबीज केंद्र व सामाजिक वनीकरण नर्सरी येथे निसर्गभ्रमंती, सातव्या दिवशी रात्रीचे खगोल दर्शन ,ग्रह तारे,नक्षत्र रास यांचा परीचय प्रत्यक्षात करून देण्यात आला,आठव्या दिवशी आलेबेदर येथे निसर्गभ्रमंतीनंतर अ.भा. अंनिसचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांचे अंधश्रद्धावर मार्गदर्शन व वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण सोबतच प्रा.अशोक गायधने यांचे साप, ग्रह तारे नक्षत्र -रास, पक्षी- प्राणी यांच्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकला. यशवंत उपरिकर यांनीसुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.नवव्या दिवशी कृषिविज्ञान केंद्र साकोली येथे निसर्गभ्रमंती नंतर विविध कृषी अवजारे ,पाळीव प्राणी- पक्षी,स्वयंचलित हवामान केंद्र,प्रकाश सापळा,मधमाशी पालनपेटी,ऍझोला हिरवळ खत यावर विस्तृत माहिती मिळाली व जलबचत यावर कृषी अभियंता योगेश महल्ले यांनी मार्गदर्शन केले. दहाव्या दिवशी पक्षी व निसर्गअभ्यासशिबिराचा समारोप कार्यक्रम संस्थाध्यक्ष विद्या कटकवार, प्राचार्य रामकृष्ण हरगुडे,बी एस लंजे,के पी बिसेन तसेच पुष्पा बोरकर मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.शिबिर सहाय्यक युवराज बोबडे,यशश्री उपरिकर,यश तिडके तसेच उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून पूर्वा बहेकार,आकांशा वाघमारे, रुणाली निंबेकर,रोहिणी भैसारे, अथर्व बहेकार त्याचप्रमाणे तेजस जांभुळकर,हिमांशू बनकर यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिबिरार्थीनी आणलेले पक्षी घरटे, आवडलेला पक्षी व फुलपाखरू चित्र,प्लास्टिक इको ब्रिक्स, फिडर बॉटल, जलपात्र तयार करून आणणाऱ्या शिबिरार्थीना बक्षीस व प्रमाणपत्रे देण्यात आली याचबरोबर सर्वाना 10 दिवसीय शिबीर सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली .काही शिबिरार्थीनी यात पूर्वा बहेकार,आकांशा वाघमारे,रोहिणी भैसारे, रुणाली निंबेकर ,तेजस जांभुळकर,धनश्री कापगते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
 या शिबिराच्या माध्यमातून 10 दिवसामध्ये 100 पेक्षा जास्त पक्ष्यांची प्रत्यक्ष ओळख,20 पेक्षा जास्त फुलपाखरू, 15पेक्षा जास्त चतुर कीटक, 4 प्रजातीचे प्रत्यक्ष नुकतेच पकडलेले जिवंत साप व छायाचित्राद्वारा अनेक पक्षी,फुलपाखरे,चतुर, कोळी,कीटक,विषारी बिनविषारी साप परिचय,सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे,आशिष वलथरे ,कैलाश वलथरे याच्या मार्गदर्शनाखाली सरपटणारे प्राणी यात पाल,बेडूक,सरडे यांचा करण्यात आलेला रेप्टाइल सर्व्हे, अनेक वृक्षाचा -वनस्पतींचा ,फुलांचा प्रत्यक्ष तसेच छायाचित्राद्वारा परिचय ,रात्रीच्या वेळेस विविध ग्रह तारे 13 नक्षत्रे 6 रासीचा प्रत्यक्ष व चार्टद्वारा परिचय असे विविध निसर्गाच्या जवळ नेणारे उपक्रम दहाही दिवस नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी या शिबिराच्या माध्यमातून करून दिला. याद्वारे पक्षीमित्र, फुलपाखरूमित्र, वृक्षमित्र तसेच सर्पमित्र, खगोलमित्र बनवून याद्वारे त्यांना अप्रत्यक्षपणे निसर्गमित्र बनविण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष कृतीपर उपक्रमातुन या शिबिराद्वारे केला गेला.सर्पमित्राद्वारा बिनविषारी सापांची हाताळणी करून शिबिरार्थीची भीती दूर केली गेली.शिबिराला मार्गदर्शन करताना संस्थासचिव विद्या कटकवार यांनी व प्राचार्य रामकृष्ण हारगुडे यांनी निसर्गशिबिराच्या माध्यमातून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडते असे प्रतिपादन केले.
     20व्या 10 दिवसीय पक्षी व निसर्गअभ्यास शिबिरात योगिनी रणदिवे,धनश्री कापगते,पूजा अग्रवाल, ऋतुजा गहाने, समृध्दी खेडीकर,नीरा रणदिवे, तेजश्री हातझाडे,ऋतुजा भिवगडे, चेतना वाघमारे,आकांक्षा वाघमारे,ऐश्वर्या संग्रामे,रोहिणी भैसारे,रुणाली निंबेकर, तेजस जांभुळकर,हिमांशू बनकर,ईशान नगरकर,संचिता करंजेकर, श्रीयांश शहारे, प्रीत गजभिये,नीरज वाघमारे, सुप्रिया कापगते, अथर्व बहेकार,पूर्वा बहेकार,यामिनी कापगते, निधी बनकर,कशिश भांडारकर,हर्ष भांडारकर,अनुराग लंजे,प्रणय कापगते,नीरज रोकडे इत्यादी शिबिरार्थीनी सहभाग नोंदविला.
    10 दिवसीय पक्षी व निसर्ग अभ्यास शिबीराच्या आयोजनाकरिता पुष्पा बोरकर,विठ्ठल सुकारे, बी.एस.लंजे यांनी तर समारोपीय कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता एच.आय. सोनवाने,सुनील मोहनकर,शिवपाल चन्ने,अनुराधा रणदिवे,निलिमा गेडाम ,जागेश्वर तिडके,प्रा.प्रशांत शिवणकर,संजय पारधी,संजय भेंडारकर तसेच इतर शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments