Advertisement

लाखनी:पृथ्वी वाचवा -वसुंधरा वाचवा -सेव्ह अर्थ' चे स्वतः रंगविलेले पोस्टर्स घेऊन वसुंधरा दिन साजरा करताना ग्रीनफ्रेंड्सचे सदस्य

ग्रीनफ्रेंड्सने अभिनव रित्या साजरा केला 'जागतिक वसुंधरा दिन साजरा'
 टाकाऊ प्लस्टिक बॉटल्स पासून बनविले प्लस्टिकच्या विटा
लाखनी बसस्थानकावर केले स्वच्छता अभियान
  लाखनी:-
    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अभिनव उपक्रमाचे आयोजन लाखनी बसस्थानकावर नगरपंचायत लाखनी माझी वसुंधरा-स्वच्छता मोहीम विभागाच्या सहकार्याने करण्यात आले.या कार्यक्रमाला ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायत स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने,नगरपंचायत सदस्य सत्यवान वंजारी,अश्विन धरमसारे,निसर्गप्रेमी मंगल खांडेकर,नगरपंचायत लाखनीचे कर्मचारी विनोद सपाटे, निमिष मुरकुटे तसेच पदमाकर गिऱ्हेपुंजे, ग्रीनफ्रेंड्सचे अनेक विद्यार्थी सदस्य आणि गणमान्य नागरिक यावेळी उपस्थित होते.या अभिनव उपक्रमाला अभाअंनिस तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्य लाभले.
  सर्व प्रमुख अतिथींचे जागतिक वसुंधरा दिनी वृक्षरोपे देऊन स्वागत केल्यानंतर यावेळी प्रास्ताविक मार्गदर्शन प्रा.अशोक गायधने यांनी केले.यात प्लस्टिक बॉटल्स पासून प्लास्टिक विटा तयार करण्याची स्पर्धा नगरपंचायतचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके व अभियंता राधेश्याम इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली याबद्दल माहिती दिली.या स्पर्धेला ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्य विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत आतापर्यंत 250 पेक्षा जास्त रंगीबेरंगी प्लस्टिक विटा गोळा करण्यात आले.लवकरच या प्लास्टिक विटांपासून एक आकर्षक वस्तू नगरपंचायत लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्क मध्ये तयार करणार आहेत अशी सुद्धा त्यांनी माहिती पुरविली.या प्लास्टिक बॉटल पासून प्लास्टिक विटा तयार करण्याच्या उपक्रमात सृष्टी वंजारी ,चैतन्य वंजारी,वेदांती वंजारी, दिक्षा बावनकुळे,गायत्री वैद्य, कृणाली गभने,कनक गायधने,मयंक वंजारी,इशांत वैद्य, चारू वैद्य, अमोली बडवाईक ,पायल चचाने,गेवेश्री निखाडे, वंशिका शेंडे यांनी सहभाग नोंदविला तसेच 'हिरवी वसुंधरा चित्रकला संदेश स्पर्धेत' सुद्धा सहभाग नोंदविला त्यांचे कौतुक यावेळी करण्यात येऊन त्यांना पारितोषिक वितरण अतिथींचे हस्ते करण्यात आले.त्याचबरोबर ग्रीनफ्रेंड्सच्या विद्यार्थी सदस्यांकडून बसस्थानकावरील नेचर पार्क मध्ये काही विघ्नसंतोषी लोकांनी व काही चहापानटपरी चालकांनी फेकलेले प्लॅस्टिक पौच, प्लास्टिक व्रपर्स आणि इतर साहित्य गोळा करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले व प्रदूषण करणाऱ्यांना स्वच्छता अभियान राबविण्याचा संदेश याकृतीद्वारे देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते व निसर्गप्रेमी ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर यांनी आपले बंधु स्व.दयाराम खांडेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबला जागतिक वसुंधरा दिन निमित्ताने 5 झाडांचे वृक्षरोपे दान ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांचेकडे प्रमुख अतिथींचे उपस्थितीमध्ये सुपूर्द केले.सर्वांनी त्यांच्या वृक्षदान उपक्रमाचे स्वागत टाळ्याच्या गजरात यावेळी केले.
  जागतिक वसुंधरा दिनाच्या या अभिनव उपक्रमाला नगरपंचायत मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके,अभियंता राधेश्याम इंगोले,ग्रीनफ्रेंड्सचे अशोक वैद्य,दिलीप भैसारे,दिनकर कालेजवार, निसर्गमित्र पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, योगेश वंजारी,साकोली बसआगाराचे व्यवस्थापक गौतम, शेंडे,लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक भास्कर डहाके, ओम आगलावे,आराध्या आगलावे इत्यादींनी सहकार्य केले

Post a Comment

0 Comments