प्रति,
मा. मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद, नागपूर
मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. पालकमंत्री, नागपूर जिल्हा
मा. सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, म.रा. मुंबई मा. जिल्हाधिकारी, नागपूर
मा. शिक्षण सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर मा. पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा
मा. शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर
विषय : गोंडवाना साम्राज्यातील, चांदागढ (चंद्रपूर) चे गोंडराजे बल्लारशाह आत्राम व नागपूर नगरी बसवून राजधानीचा दर्जा देणारे गोंडराजे बख्त बुलंदशाह उईके यांचा गौरवशाली ईतिहास राज्यातील प्राथमिक शिक्षणात समाविष्ट करणेबाबत.
मा. महोदय/महोदया,
जय सेवा - सेवा जोहार - जय गोंडवाना !
वरिल विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, भारत (India) देशाचा मध्यभाग हा गोंडवाना साम्राज्य (Central Provinces and Berar) म्हणून ओळखला जातो. त्यात आताचे मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाना, विदर्भ व इतर प्रांतचा समावेश आहे. गोंडराजांची 1400 वर्षे सुसमृध्दपणे, 258 रियासत, 52 गढ, 57 परगणाचे निर्माण करुन, गोंडवाना साम्राज्य स्थापन केले. त्या विरासतीचे अस्तित्व आजदेखिल जिर्ण-अजिर्ण अवस्थेत आहे. त्यात गोंडराजे संग्रामशाह मडावी (सन 1482-1532) यांचा योगदान गोंड समुदाय कधीही विसरु शकत नाही. परंतु, स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव सुरु असून देखील त्यांचा ईतिहास व योगदान जनतेपासून, तसेच गोंड समुदायांपासून का लपविण्यात येत आहे ?
चांदागढ (आताचे चंद्रपूर) येथील गोंडराजे सुरजा ऊर्फ सेरशाह आत्राम यांच्या निधनानंतर इ.स. 13 व्या शतकात त्यांचा मुलगा गोंडराजे बल्लारशाह आत्राम (सन 1282-1303) यांनी आपल्या कार्यकाळात चंद्रपूर सह परिसरातील आताचे विदर्भ विभागात ठिकठिकाणी किल्ले, तलावे बांधून सुसमृध्दपणे राज्य करुन, क्षेत्राचा विकासाकरीता आपले योगदान दिले. त्यांनी चंद्रपूर येथे किल्ल्याची व विविध प्रवेशद्वाराची निर्मीती केली. तसेच, गोंडराणी राजमाता हिराई आत्राम (सन 1668 ते 1728) यांनी सुध्दा आपला संपुर्ण जीवन चांदागढच्या विकासकार्याला दिला. म्हणून त्यांना चांदागढ नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते.
गोंडराजा सारबासा यांचा वंशज जाटबा (सन 1590) हे देवगढ च्या गादीवर बसून, राज्यकारभार सांभाळले. नंतर त्यांचा पहिला मुलगा दलपतशाह (सन 1620) व दुसरा मुलगा कोकशाह (1634) गादीवर बसले. त्यांनी विविध भागात गढ-किल्ले बांधले. कोकशाह नंतर लहान भाऊ गोंडराजे बख्त बुलंदशाह उईके यांनी सन 1702 मध्ये राजधानी नागपूरात बसवून, नागपूर नगरीची स्थापना करुन, पुर्वेकडे वऱ्हाड पर्यंत विस्तार केले. त्यामुळे त्यांना नागपूर नगरीचे संस्थापक व शिल्पकार म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या कारकिर्दीत नागपूरसह गोंडवाना भागात कृषी, उद्योग व व्यापार वाढीस लागले. सन 1706 मध्ये त्यांचा मृत्यु झाला व त्यांचा मुलगा गोंडराजे चाँद सुलतान उईके यांनी नागपूर नगरीच्या विकासकार्यात आपला अमुल्य योगदान दिले.
गोंडवाना साम्राज्यातील स्थानिय ईतिहासाचे रक्षण व्हावे. करीता, स्थानिय ईतिहासाच्या जोपासणासाठी गोंडवाना साम्राज्यातील, चांदागढ (चंद्रपूर) चे गोंडराजे बल्लारशाह आत्राम (सन 1282-1303) व नागपूर नगरीचे संस्थापक व शिल्पकार गोंडराजे बख्त बुलंदशाह उईके यांचा गौरवशाली ईतिहास राज्यातील प्राथमिक शिक्षणात समाविष्ट करण्याची मागणी गोंड समुदायांसह, संघटनेनी केलेली आहे.
(प्रशांत उदारामजी पंधरे)
युवा उपाध्यक्ष, बि.फा.संघटना (गोंडवाना-विदर्भ शाखा),
नागपूर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ (भारत),
अध्यक्ष, जय गोंडवाना बहु. व क्रिडा मंडळ, नागपूर (महा. राज्य)
0 Comments