Advertisement

शिक्षक सुशीलकुमार पावरांचे 267 वे उपोषण..लढा सुरूच

दापोली:दोषी व बोगस अधिकारी हे निर्लज्ज आहेत.अनेक गंभीर प्रकरणात दोषी ठरले.ज्यांची पात्रताच चौकशीत बोगस ठरली.जे जिल्हा बदली शिक्षकांकडून पैसे घेताना सापडले.ज्यांच्यावर 2 कोटी सरकारी योजनेत घोटाळा चौकशीत सिद्ध झाला.अशा बोगस, भ्रष्टाचारी अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण मी सुरूच ठेवणार आहे असा निर्धार करत जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 267 वे उपोषण दापोली येथे सुरूच ठेवले आहे.आर.एम.दिघे गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांनी पावरा यांनी दिलेल्या उपोषणाच्या निवेदनाची दखल घेतली आहे. गटविकास अधिकारी दापोली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना मागण्यांबाबत कार्यवाहीसाठी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
                दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी श्री. विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक , दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत श्री. एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी पावरा यांनी हे उपोषण सुरू केले आहे. 
              विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे.
           एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर दोषी, भ्रष्टाचारी व बोगस अधिका-यांना पाठीशी घालणे,शिक्षक कर्मचा-यांचा छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीभेद करणे,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिका-यांचे आदेश दडपून ठेवणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे,दिशाभूल करणारे पत्रव्यवहार करणे,आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणे इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. 
            नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी किरण लोहार यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
        दोषी व बोगस अधिका यांचे पितड चौकशीत उघडे पडले.या दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी अनेकदा केली जाते.वृत्तपत्रात व टिव्हीवर बातम्या सुद्धा सारख्याच येतात. पण याचा या दोषी अधिका-यांवर काहीही फरक पडताना दिसत नाहीत. अशा निर्लज्ज अधिका-यांवर कारवाईची मागणीसाठी शिक्षक सुशीलकुमार पावरा सातत्याने उपोषण करत आहेत.

Post a Comment

0 Comments