Advertisement

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दापोलीत अभिवादन करण्यात आले.



दापोली:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दापोलीत अभिवादन करण्यात आले. पूज्य साने गुरुजी  बालउद्यान दापोली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बिरसा फायटर्स संघटनेने महामानवास अभिवादन केले. यावेळी बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, पिंगला पावरा, हॅरी पावरा ,हॅलन पावरा  सह काही आदिवासी बांधव उपस्थित होते.डाॅ.आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन करण्यासाठी दापोली येथील बाल उद्यानात लोकांची अफाट गर्दी जमली होती .पुतळ्याच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

           जाती निर्मूलन,स्त्री पुरुष समानता, सर्वांना शिक्षण, धर्मचिकित्सा हे मूलभूत विषय घेऊन डाॅ.आंबेडकरांनी लढे उभे केले.त्यांनी सर्व वंचित, पिडीत,दुबळे यांना अस्तित्व, अस्मिता,ऊर्जा  व प्रकाश दिला. 1927 मध्ये मागासवर्गीय समाजाला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.1930 मध्ये  मागासवर्गीयांना मंदिरात सन्मानाने प्रवेश मिळाला यासाठी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केला.शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मुलमंत्र दिला.माणूसकीच्या आग्रहासाठी केलेल्या सत्याग्रहातून दलित समाजात  अस्मिता जागृत केली.

            बाबासाहेबांनी लोकशाही बरोबरच धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचाही पुरस्कार केला.कोणत्याही एका धर्माला विशेष महत्त्व दिले नाही. सर्व धर्म समान मानले आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि सामाजिक न्याय बहाल करणारी  उच्चतम लोकशाही मूल्ये संविधानाच्या उद्धेशीकेत नमूद केली.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बंधूंता,समता,धर्मनिरपेक्ष विचारधाराच आपल्या भारत देशाला एकसंघ बांधून ठेवेल,अशा महामानवास  कोटी कोटी अभिवादन करतो, अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी यावेळी दिली आहे.

Post a Comment

0 Comments