Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी सुशिलकुमार पावरा करणार आपले ५१२ वे उपोषण



शहादा प्रतिनिधी: मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हजारों निवेदन देऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई अद्याप करण्यात आली नसल्याचे सुशिलकुमार पावरा हे आपलं ५१२ वे उपोषण आझाद मैदान मुंबई येथे करणार आहेत. न्याय देता येत नसेल तर राजीनामा द्या,पुढील कारणास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे.सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक अश्लील व वाईट शिविगाळ अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणा-या तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर पोलिस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल नाही , अटक नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांची हत्या करणाऱ्या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल नाही,अद्याप एकाही आरोपीला अटक नाही .सुशिलकुमार पावरा यांच्या घरात रात्री विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून मोबाईल सह वस्तूंची चोरी करणाऱ्या संशयित पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई नाही.
               आदिवासी महिला व बालके घरात झोपलेले असताना रात्री विना वर्दीत घुसून अत्याचार करणाऱ्या १० पेक्षा अधिक संशयीत पोलिसांवर गुन्हा दाखल नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई नाही.तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दूरूपयोग करून सुबुद्धीने पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन सुशिलकुमार पावरा सह ९ सामाजिक कार्यकर्त्यांना नंदुरबार जिल्हा हद्दपारीची असंवेधानीक कारवाई केली. २ वर्षांपूर्वी मेलेल्या व्यक्तीवर ४३ कलमे लावून खोटे व बनावट गुन्हे दाखल करणा-या पोलीसांवर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही .
सुशिलकुमार पावरा यांच्या वर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री बेकायदेशीर केव्हाही घरात घुसून अटक केली जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सामाजिक कार्यकर्त्यांवर व आदिवासींवर पोलिसांकडून खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करण्याचे प्रमाण वाढले.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १ हजार पेक्षा अधिक निवेदन पाठवूनही न्याय देण्यास देवेंद्र फडणवीस निष्क्रिय ठरले.म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments