Advertisement

पोलीस अधिक्षक श्रवण दत्त सह आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

सुशिलकुमार पावरा यांनी छेडले ५०७ वे उपोषण!

शहादा प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात,माझ्यावर पोलिसांनी केलेल्या अन्याय अत्याचारांविरोधात, पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात, अवैद्य धंदे बंद करा अशा मागण्यांसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आज दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा कार्यालयासमोर आपले ५०७ वे उपोषण छेडले.
                 पोलीस कस्टडीत मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुष पणे मारहाण करणा-या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आषित कांबळे,गुन्हे अन्वेषण विभाग नंदूरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर ॲस्ट्रासिटी, अमानुष पणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरूपयोग केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तात्काळ बडतर्फ करा. वादग्रस्त,आरोपीत पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा. 
                      आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवणा-या,आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा ३५४ चा गुन्हा दाखल करतो,अशी धमकी आदिवासी समाजिक कार्यकर्ते सुशिलकुमार पावरा यांना देणा-या तत्कालीन पोलीस निरीक्षक शहादा निलेश देसले यांच्यावर दिनांक ४/४/२०२५ रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा .शहादा पोलीस ठाण्यात ड्यूटीवर असतांना विमल गुटखा खाणा-या पोलिसांवर कारवाई करा.नंदुरबार जिल्ह्य़ातील सट्टा- मटका,जुगार, दारू,गुरखा,गांजा,असे अवैद्य व्यवसाय बंद करा.तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून ४३ हजार रूपये घेणाऱ्या धडगांव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 
                  मला पोलीस कस्टडीत मारहाण प्रकरणाचा मेडिकल रिपोर्ट डाॅक्टरला पैसे देऊन मॅनेज करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे बदलायला लावला आहे.माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले किंवा माझा घातपात झाला किंवा माझ्यावर पुन्हा खोटा गुन्हा करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार या ५ पोलीस अधिकाऱ्यांनी धरण्यात यावं.मला न्यायदेवतेकडून न्याय मिळेल,असा मला विश्वास आहे,अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments