Advertisement

पिंडकेपार त साकोली येथे बिरसा फायटर्सच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा व समाजबांधवाचे वतीने वॄक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जल जमिन जंगल वाचवा व मानव जात व निसर्गाचे नाते जगवा या मंञाचा वापर करा असे सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी कार्यकर्त्याना आँन लाईन विश्व मुललनिवासी  World indiginiuos day शुभेच्छा दिल्या .

श्रमदानातून वॄक्षदान व उद्याने बनवून आँक्सिजन बागा तयार करणारा पिंडकेपार एकमेव ग्राम 



एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी 

साकोली (९आँगष्ट): स्वातंञ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करित असतांना घरोघरी तिरंगा फडकवू तर हर व्यक्ती एक झाड लावूया या धरतीवर पिंडकेपार गावी (मुल निवासी समाजबांधवानी ग्राम शाखा बिरसा फायटर्स,व राणी दुर्गावती मंचाचे वतीने विधीवत निसर्गशक्तीची पुजा करून आदि मानव व वनस्पती हे नाते पक्के करण्यासाठी जिवनमान उंचावून झाडे लावून पॄथ्वीचे संरक्षण व मानव जीवन रक्षणाचे कार्य भगवान बिरसामुंडाने केले तसेच त्यांचेच पाऊलावर पाऊल टाकुन दरवर्षी प्रमाने गावातून रँली काढून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावन भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडला ह्यागावाने समाज संघटणे चे मागणी केलेल्या हक्काच्या जागेवर झाडे लावून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा विक्रम रचलेला अाहे .तो उपक्रम सर्व आदिवासी बांधवानी करावा यावेळी सुध्दा जिल्हा प सदस्या दिपलता समरित,मा जिप सदस्य नंदुभाऊ समरित,प्रथम नागरिक सुनिता समरित,जि.कार्याध्यक्ष विनोद कंगाले,तालुका कार्याध्यक्ष दुलिचेदजी कुसराम ,दिलिपजी सयाम सर,वडेगांव,शामरावजी घोळंगे,समोचित भाषने झाली व वॄक्षारोपणावेळी महिला व समाज बांधव हजर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डि के कुसराम( मा. सरपंच ) कैलासजी टेकाम संचालन तर समारोप होमराज कुसराम संपर्क प्रमुख बि फा यांनी केले.

Post a Comment

0 Comments