Advertisement

बोराडी येथे जय आदिवासी युवा शक्ती (जयस) ची अनेक विषयांवर चर्चासत्र संपन्न.!

    शिरपूर तालुक्यातील जय आदिवासी युवा शक्ती (जयस) कार्यकारणी टीम, पदाधिकारी, जयस विचारक युवा ह्या सर्वांची भविष्यात जयस ची भूमिका, सामाजिक अडचणीत उभी करायची सामजिक चळवळ, येणाऱ्या काळातील जयसची रणनीती, नवीन शाखा शुभारंभ, शिरपूर शहर नवनियुक्त कार्यकारणी तयार होणे, ग्रामपंचायत क्षेत्रात सामजिक राजकीय बदलासाठी जयस विचारक व पदाधिकारी ह्यांनी ग्रामपंचायतीत सहभागी ह्यात विजयी व पराजित पदाधिकाऱ्यांचे सत्कार समारोप करणे, जयस शाखा तिथं वाचनालय ही संकल्पना प्रत्यक्ष करणे, जयस च्या माध्यमातून लोकांना शासकीय योजनांचा फायदा व प्रत्यक्ष उपयोग होण्यासाठी एक स्वतंत्र ऑफिस उघडण्याचा माझा मानस संजय पावरा सर ह्यांनी व्यक्त केला ह्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनाचा लोकांना आपल्या माध्यमातून फायदा करून देणे, ह्याशिवाय शिरपूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, दोंडाईचा येथील आमदार जयकुमार रावल ह्यांचे आमदारकी रद्द व्हावे ह्यासाठी निवेदन, शिरपूर शहरात निवेदन देऊन सुद्धा रावण दहन होणे ह्याबाबतीत खुलासा होणेसाठी निषेध निवेदन, शिरपूर शहरात आदिवासी क्रांतीविरांचे स्मारक व्हावे ह्यासाठी निवेदन आंदोलन अनेक विषयांवर सामूहिक चर्चासत्र आयोजित करायचे आहे.
ह्यावेळी जयस सोबत जुळणाऱ्या नवीन युवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.

ह्यावेळी मार्गदर्शक व प्रमुख उपस्थिती म्हणून जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, जयस शिरपूर तालुका अध्यक्ष भूपेश पावरा, उपाध्यक्ष जगदीश पावरा, तालुका प्रसिद्धी प्रमुख सुनील पावरा, जयस विचारक शब्बीर पावरा सर, झूम मीटिंग मार्फत संजय पावरा सर, शिरपूर शहराध्यक्ष जगदीश पावरा, भोजू पावरा, बिरसा फायटर्सचे धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, काकड्या पावरा, बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष भरत पावरा, जयस योद्धे दिलीप पावरा, मोतीलाल पावरा, अनिल पावरा,योगेश पावरा, सतीश पावरा, पंकज पावरा, संजय पावरा, दिनेश पावरा, प्रताप पावरा, झिण्या पावरा, दिनेश पावरा, जगन पावरा, राहुल पावरा, सुनील पावरा, विजय पावरा, मुकेश पावरा, सुनील पावरा, आण्णा पावरा आदी उपस्थित होते.

ह्यावेळी आभार व समारोप डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले.

Post a Comment

0 Comments